मलायकाच्या ‘या’ सवयीची अरबाजला येत होती चीड

एका मुलाखतीत अरबाजने केला होता खुलासा.

arbaaz khan, malaika arora,
एका मुलाखतीत अरबाजने केला होता खुलासा.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाचं लग्न हे अरबाजशी झालं होतं. अरबाज आणि मलायकाचं लग्न १९९८ साली झालं होतं. १९ वर्ष संसार केल्यानंतर ते विभक्त झाले.

विभक्त होण्याच्या काही वर्षांआधी अरबाज आणि मलायकाने एका चॅटशोमध्ये हजेरी लावली होती. या चॅट शोमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी अरबाजची कोणती गोष्ट आवडत नाही याचा खुलासा मलायकाने यावेळी केला आहे. “अरबाज हा बेजबाबदार आहे. तो घरातल्या वस्तू त्याच्या जागेवर न ठेवता दुसरीकडे कुठे ही ठेवतो आणि यामुळे तिला त्रास होतो. एवढंच नाही तर वेळेसोबत अरबाजची ही सवय वाढतचं जात होती”, असं मलायका म्हणाली. तर मलायकाची कोणती सवय आवडत नाही हे सांगत अरबाज म्हणाला, “मलायका तिची चूक कधीच मान्य करत नाही.”

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

आणखी वाचा : ‘आलू का पराठा…’, उर्फीचा अजब लूक सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, आता अरबाज हा जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर मलायका ही सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका नेहमीच तिच्या आणि अर्जुनमध्ये असलेल्या वयाच्या फरकामुळे चर्चेत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arbaaz khan once revealed he hated this habit of malaika arora dcp

Next Story
कंगना रणौतचा पुन्हा प्रेमभंग? सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, “तेरे लिए…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी