Zendaya and Tom Holland Secret Wedding: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग असतो. त्यांच्या अभिनयाचा, त्यांनी साकारलेल्या पात्रांचा इतकेच नाही, तर कलाकारांच्या सौंदर्याचादेखील मोठा चाहतावर्ग असतो.

आपले आवडत्या कलाकारांचे पडद्यामागचे आयुष्य कसे आहे, ते खऱ्या आयुष्यात कसे आहेत. ते खऱ्या आयुष्यात इतरांशी कसे वागतात, त्यांचे जोडीदार कोण आहेत, त्यांनी लग्न केले आहे का, त्यांची मुले काय करतात, अशा अनेक गोष्टी चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

‘स्पाइडर मॅन’ फेम लोकप्रिय जोडप्याने गुपचूप उरकले लग्न?

आता लोकप्रिय जोडप्याने गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जात आहे. हॉलीवूड कलाकार झेंडया आणि टॉम हॉलंड यांनी लग्नगाठ बांधली आहे, असे म्हटले जात आहे. सेलिब्रिटी स्टाइलिश लॉ रोचने हा दावा केला आहे. लॉ रोच गेल्या अनेक वर्षांपासून झेंडयाची स्टायलिश म्हणून काम करत आहे. रेड कार्पेटवर जेव्हा तिला अॅक्सेस हॉलीवूडने झेंडया आणि टॉमच्या नात्याबद्दल विचारले त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

१ मार्च २०२६ ला अॅक्टर अवॉर्ड सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर बोलताना लॉ रोच झेंडया आणि टॉमबद्दल म्हणाली, “त्यांचे लग्न आधीच झाले आहे.” पुढे ती विनोद करत मीडियाला उद्देशून म्हणाली, “तुम्ही त्यांच्या लग्नाला हजेरी लावू शकला नाहीत.” त्यावर पत्रकाराने तिला विचारले, “हे खरे आहे का?” यावर लॉ रोच पुन्हा हसत म्हणाली, “हो. हे अगदी खरे आहे.”

लॉ रोचच्या या दाव्यानंतर चाहते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. यादरम्यानच, गेल्या वर्षी या जोडप्याने साखरपुडा केल्याच्या चर्चा झाल्या होत्या, त्याबद्दल पुन्हा बोलले जात आहे. तसेच, २०२५ ला पार पडलेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यामधील २९ वर्षीय झेंडयाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये तिच्या हातातील एका हिऱ्याच्या अंगठीने लक्ष वेधले होते. त्यानंतर टॉम आणि झेंडयाने साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते.

पीपल मॅगझिननुसार २९ वर्षीय टॉम आणि झेंडयाने १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. हे दोन्ही कलाकार त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिकरीत्या फारसे बोलत नाहीत. २०१६ मध्ये स्पायडर-मॅन : होमकमिंग या चित्रपटात एकत्र कास्ट केले होते. त्यावेळी त्यांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या होत्या.

टॉम आणि झेंडया यांनी स्पाइडर मॅन: होमकमिंग, स्पायडर मॅन: फार फॉर्म होम, स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे, स्पायडर मॅन: नो वे होम तसेच द ऑडसी या चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

दरम्यान, आता टॉम आणि झेंडया यांच्या लग्नाबद्दल अधिकृत कधी घोषणा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.