बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याची आई मोना शौरीसोबतचं नातं खूपच घट्ट होतं. अर्जून कपूरच्या आई मोना शौरा याचं ९ वर्षांपूर्वीच निधन झालंय, परंतू अर्जुन कपूर आजही आईची आठवण काढतच असतो. अर्जुन त्याच्या आईवर खूप प्रेम करत होता, पण वडील बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या अफेअरबद्दल त्याला कळाल्यानंतर दोघा बाप-लेकाच्या नात्यात दुरावा आला. बोनी कपूर जेव्हा मोना शौरा यांच्यासोबत राहत होते तेव्हापासूनच ते श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर मोना आणि बोनी कपूर दोघे वेगळे झाले आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत लग्न केलं.

त्यानंतर अर्जून कपूरने श्रीदेवीला कधीच आईचा दर्जा दिला नव्हता. पण श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जूनने वडील बोनी कपूर आणि त्यांच्या कुटूंबाला आधार दिला. आजही अर्जून कपूरला असं वाटतंय की, जे झालं ते योग्य नव्हतंच. परंतू आता अर्जून या गोष्टी समजू लागला आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जून कपूर आणि बोनी कपूर यांच्यामधला दुरावा हळुहळु कमी होऊ लागला आणि बघता बघता सारं काही सुरळीत झालं. या विषयावर बोलताना अर्जून कपूर म्हणाला, “त्यावेळी माझ्या आईने दिलेले संस्कार माझ्या डोक्यात होते…वडिलांच्या दुसऱ्या प्रेमामुळे आम्हाला कितीही वाईट दिवस बघावे लागले असले तरी तू नेहमीच तुझ्या वडिलांच्या सोबत रहा, असं माझ्या आईने मला सांगितलं होतं….माझे वडील दुसऱ्या प्रेमात पडले होते, त्यांच्या प्रेमाचा मी मान राखतो…कारण प्रेम हे कॉम्प्लेक्स असतं आणि लोक २०२१ च्या काळात जगत असताना म्हणतात प्रेम एकदाच होतं…या फक्त बॉलिवूड लाईन्स आहेत…पण प्रेम हे खूप कॉम्प्लेक्स आहे, मुळात ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे.”

यापुढे बोलताना तो म्हणाला, “दुर्भाग्यामुळे लोक वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतात…तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करू शकता आणि त्यानंतर पुन्हा आणखी दुसऱ्या व्यक्तीच्याही प्रेमात पडू शकता…असं होऊ शकतं…मी हे नाही बोलू शकत की माझ्या वडिलांनी जे केलं तो योग्य होतंच म्हणून…माझ्यासाठी ते चूकीचंच होतं…कारण मी त्यांचा मुलगा असल्याकारणाने माझ्यावर या सर्व गोष्टींचा खूप प्रभाव पडला होता…पण मी या गोष्टी समजू शकतो…ठीक आहे, असं होत असतं, असं मी नाही बोलू शकत…ज्या व्यक्तीने आधीच आपल्या आयुष्यात अशा गोष्टी अनुभवल्या आहेत, मोठा झाल्यानंतर सुद्धा त्याच दृष्टीने मी या गोष्टींना पाहतोय. त्यामूळे हे खूप चांगलं समजू शकतो मी…मी एक चांगला मुलगा बनण्याचा प्रयत्न केला कारण माझ्या आईची सुद्धा हीच इच्छा होती.”