अर्जुनने हेअर केअर सेशनचा व्हिडीओ केला शेअर, मलायका म्हणाली…

अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

arjun kapoor, malaika arora,
अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अर्जुन सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अर्जुनने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन शूटसाठी तयार होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘लाइट…कॅमेरा…अॅक्शन’ असे कॅप्शन अर्जुनने दिले आहे. अर्जुनच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींनीही कमेंट केली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या कमेंटने वेधले आहे. मलायकाने फायर इमोजी वापरत अर्जुनची स्तुती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

अर्जुनने गेल्या आठवड्यात Mercedes Maybach GLS600 एसयूव्ही खरेदी केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या SUV ची किंमत २.४३ कोटी रुपये आहे. अर्जुनने त्याच्या गाडीचा नंबर ०२९११ ठेवला आहे. त्याच्या गाडीचा नंबर हा त्याच्या वडिलांची जन्म तारीख २९ डिसेंबर आणि बहीण अंशुला कपूरची जन्म तारीऱ ११ नोव्हेंबर आहे.

आणखी वाचा : ‘हे टी-शर्ट २०० रुपयांना लिंकिंग रोडला मिळेल’, कपड्यांमुळे करीना कपूर झाली ट्रोल

अर्जुनचा ‘भूत पोलीस’ हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय अर्जुन कपूर ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारियासोबत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arjun kapoor shares video from his hair care session malaika arora comment on it dcp

ताज्या बातम्या