मलायकासाठी जेवणात काय बनवशील?, अर्जुनने केला खुलासा

जाणून घ्या मलायकासाठी अर्जुनला काय बनवायचे आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी ‘Star vs Cook’ या शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान, अर्जुनने यावेळी काका आणि काकू संजय कपूर आणि महीप कपूरयांच्यासाठी लाल मासं आणि चपली कबाब ही डिश बनवली.

पहिल्यांदा स्वयंपाक बनवत असलेल्या अर्जुनला रॅपीड फायर हा खेळ खेळावा लागला. बॉलिवूडमधील त्याच्या मित्र-मैत्रिणींसाठी तो काय बनवेल? आणि त्यात अर्जुनला काही कलाकारांची नावे सांगितली. पहिलं नाव हे त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराचं होतं. “तिला गोडं खायला आवडतं, जर खरोखर मी चांगल जेवन बनवू शकलो तर मी तिच्यासाठी गोड पदार्थ बनवेण”, असं अर्जुन म्हणाला. तर दुसरं नाव हे अभिनेत्री अनुष्का शर्माचं होतं. अनुष्कासाठी काय बनवणार हे सांगत अर्जुनने एक मजेदार किस्सा सांगितला आणि म्हणाला, “अनुष्कासोबत असताना एकदा मला भूक लागली होती. त्यावेळी तिने सेरेलॅकचा डब्बा मागवला आणि सेरेलॅक बनवून खालं. आता तर तिला याची गरज आहे कारण तिला आता बाळ झालं आहे तर तिच्यासाठी नक्कीच मी सेरेलॅक बनवेण.”

 

View this post on Instagram

 

A post shared by discovery+ India (@discoveryplusin)

पुढे अर्जुनला वरुणसाठी काय बनवशील असे विचारले. अर्जुन लगेच म्हणाला, “चिकन! चिकनचा कोणताही प्रकार त्याला आवडेल. त्याला चिकन प्रचंड आवडं तो चिकनसाठी जगतो. अॅक्टिंग क्लासमध्ये एकदा तो म्हणाला होता की त्याच्या कुटुंबापेक्षा त्याला जास्त प्रिय चिकन आहे.” तर अभिनेता रणवीर सिंगबद्दल विचारता अर्जुन म्हणाला, “काहीही जे खाऊन तो शांत होईल. कोणतीही गोष्ट जी खाल्याने तो शांत होईल.” “तर गोड पदार्थ खाल्यावर तो शांत होईल का?” असं विचारता तो म्हणाला, “साखर खाल्याने तो आणखी उस्फुर्त होईल, त्याच्या संपूर्ण शरीरात कॉफी आहे. मी या मुलाला काय देऊ? वास्तविक पाहता मी त्याला उपाशी ठेवेल, म्हणजे त्याच्यातली एनर्जी कमी होईल आणि तो शांत होईल. मी हे करेल पण, प्रेमाने मी त्याच्यासाठी सिंधी करी आणि भात बनवेल कारण तो सिंधी आहे. हे खाऊन त्याला आनंद होईल असं मला वाटतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

दरम्यान, ‘डिस्कव्हरी +’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा कार्यक्रम पाहता येईल. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळे कार्यक्रम हे हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि मराठीसोबत आणखी ८ भाषांमध्ये अनेक क्रार्यक्रम पाहता येतील. यावर आपल्याला विज्ञान, अॅडव्हेंचर, वेगवेगळ्या ठिकाणाच्या अन्न पदार्थ आणि जीवनशैलीसोबत आणखी ४० प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arjun kapoor want to cook a sweet dish for ladylove malaika arora dcp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या