अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडला पूत्ररत्न

अर्जुनचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्याने आनंदी आहे

अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रएला प्रेग्नंट असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. काल १७ जुलै रोजी गॅब्रएला, अर्जुन आणि त्याचे आई-वडिल हिंदुजा हॉस्पिटालला जाताना दिसले होते. त्यानंतर गॅब्रएला एक गूड न्यूज देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता अर्जुन रामपाल बाबा झाल्याचे समोर आले आहे.

अर्जुनला पूत्र रत्न झाल्याचे समोर आले आहे. अर्जुनच्या दोन्ही मुली देखील नव्या पाहुण्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. अर्जुनचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्याने आनंदी असल्याचे म्हटले जात आहे.

अर्जुन आणि मेहर यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून अर्जुन गॅब्रएलासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. आता गॅब्रएलाला पूत्र रत्न झाला आहे. गॅब्रएलाच्या प्रेग्नंसीविषयी मला कोणतीही तक्रार नासल्याचे याआधी मेहरे सांगितले होते. त्यामुळे गॅब्रएलाच्या डोहाळजेवणामध्ये मेहरचे महत्वाचे योगदान होते.

दरम्यान, ‘मिस इंडिया’चा किताब पटकावणाऱ्या मेहर जेसिया आणि अर्जुनने वीस वर्षांपूर्वी विवाहगाठ बांधली होती. पण, गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील मतभेद वाढू लागल्याने अखेर विभक्त होण्याचा टोकाचा निर्णय या दोघांनी घेतला. या निर्णयानंतर अर्जुन त्याच्या आयुष्यात पुढे वळाला असून तो गेल्या काही काळापासून गॅब्रएलाला डेट करताना दिसत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arjun rampal girlfriend gabriella blessed with baby boy avb

ताज्या बातम्या