करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीचा जबरदस्त आर्थिक फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. शूटिंगवर जाणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आता दररोज तपासणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दरम्यान अभिनेता अर्जुन रामपाल असंच एक चेकअप करत असताना समोरील व्यक्तीला शिंका आली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

अर्जुन चित्रीकरणास जाण्यापूर्वी आपलं रुटिन चेकअप करत होता. तपासणी करणारा व्यक्ती अर्जुनला सॅनिटाईझर आणि पल्स ऑक्सीमीटर देत होता. शिवाय त्याच्या शरीराचं तापमान देखील तापासत होता. तेवढ्यात तपासणी करणारा व्यक्ती उभं राहून शिंकू लागतो. दरम्यान अर्जुन त्याला लांबूनच बसण्याची खूण करतो. यावेळी अर्जूनच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

महाराष्ट्रात आज अवघे ५ हजार ९८४ नवे करोना रुग्ण

महाराष्ट्रात आज अवघे ५ हजार ९८४ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५ हजार ६९ रुग्ण मागील २४ तासांमध्ये बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ नवे करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ८६.४८ टक्के एवढे झाले आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.