निर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप | Loksatta

निर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप

सीरिजमध्ये भारतीय जवानांबद्दल व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या.

निर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर अडचणीत सापडली आहे. बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एकता कपूरच्या वेब सीरिज थ्री एक्सच्या दुसऱ्या पर्वामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांबाबत आक्षेप घेण्यात आला होता. एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यावर सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप करत गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसराय न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या वेब सीरिजमध्ये अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यामध्ये सैनिकांच्या पत्नींशी संबंधित आक्षेपार्ह दृश्यही होते. वेब सीरिजमधील एका दृश्यात, जेव्हा भारतीय जवान ड्युटीवर असतो, तेव्हा त्याची पत्नी लष्करी गणवेश घालून मित्रांबरोबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध बिहारच्या बेगुसरायमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी सांगितलं की, ही वेब सिरीज एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी रिलीज केली होती. यामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. एक्स-सर्व्हिसमेन सेलचे शंभू कुमार यांनी या वेब सीरिजच्या सीन्सबाबत बेगुसराय कोर्टात केस दाखल केली होती. हे प्रकरण राजीव कुमार यांच्या न्यायालयामार्फत विकास कुमार यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले आणि तिथून हे अटक वॉरंट जारी करण्यात आले.

रिपोर्ट्सनुसार, एकता कपूरने या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण देत सीरिजमधून सीन हटवल्याची माहिती दिली होती. शिवाय तिने माफीही मागितली होती. एकता कपूरची ही मालिका २०२० मध्ये रिलीज झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन

संबंधित बातम्या

विक्रम गोखलेंच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रतिक्रिया म्हणाले, “अभिनयाची संस्था…”
“आधीच श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षेंची संतप्त प्रतिक्रिया
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
विश्लेषण : लहान वयात मालिका, चित्रपट ते थेट बिग बॉसच्या घरात चारित्र्यहनन; अभिनेत्री सुंबूल तौकीर खान प्रकरण नेमकं आहे काय?
“मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो”… नाना पाटेकर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात