“मी ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करायला सांगितला आणि…”, अर्शी खानने सांगितली अपघाताची आपबिती

मला बेशुद्धीच्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले, असेही ती म्हणाली.

बिग बॉस फेम आणि टेलिव्हिजन मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्शी खान हिच्या गाडीचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. या अपघातात ती गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतंच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर प्रथमच अर्शी खानने प्रतिक्रिया दिली आहे. “मला किंवा माझ्या कोणत्याही चाहत्याला गंभीर दुखापत झाली नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानते,” असे ती प्रसारमाध्यामांशी बोलताना म्हणाली.

अर्शी खानला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या तब्ब्येतपासून अपघात कसा घडला याबाबतचा सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी अर्शी खानने ‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाली, “मी माझ्या गाडीतून बाहेर जात होती. त्यावेळी माझे काही चाहते बाहेर माझी प्रतिक्षा करत होते. ते माझ्या गाडीजवळ आले. मला माझ्या चाहत्यांना एक झलक देता यावी यासाठी मी ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितला. मात्र तेवढ्यात मागून एक दुसऱ्या गाडीने आमच्या गाडीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचा समोरील काच चक्काचूर झाली,” असे तिने सांगितले.

“या अपघातामुळे माझ्या डोक्याला जबर मार बसला. अपघातादरम्यान मी गाडीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती, हे मला आठवतंय. त्याचवेळी समोर असणारे काही चाहते धावत माझ्याजवळ मदतीसाठी आले. मात्र तोपर्यंत मी बेशुद्ध झाली. मला बेशुद्धीच्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले,” असेही ती म्हणाली.

हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम अर्शी खानच्या गाडीचा भीषण अपघात, गंभीर जखमी

पण सुदैवाने या अपघातात इतर कोणालाही दुखापत झाली नाही, यासाठी मी देवाचे आभार मानते. तसेच मला कोणतीही अंतर्गत दुखापत झाली नाही याबद्दल मी आभारी आहे. तसेच रुग्णालयात करण्यात आलेल्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत, असे माहिती तिने यावेळी दिली.

दरम्यान अर्शीच्या अपघातानंतर सोमवारी संध्याकाळी तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये पोहोचला. यानंतर ती मुंबईला रवाना झाली असून पुढील काही दिवस डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा शूटींगला सुरुवात करणार आहे.

अर्शी खानचा अपघात दिल्लीतील शिवालिक रोडवरील मालविया नगरमध्ये झाला. अपघातावेळी अर्शी ही त्या कारमध्येच बसली होती. या अपघातात अर्शी ही गंभीररित्या जखमी झाली होती. तिला दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नुकतंच तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. सध्या या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arshi khan talks about her accident in new delhi how this happens nrp

ताज्या बातम्या