scorecardresearch

हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानला बॉयफ्रेंडने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “डार्लिंग…”

या पार्टीत सुझान खान, तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी, हृतिक रोशन आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादही सहभागी झाले होते.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. सुझान खान आणि हृतिक रोशनने लग्नाननंतर १४ वर्षांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून हृतिकच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. यानंतर गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान ही अभिनेता अर्सलन गोणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतंच या दोघांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

सुझान खान आणि अर्सलन गोणी हे दोघेही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ते दोघेही एकमेकांसोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतंच सुझान खानने गोव्यामध्ये एक हॉटेल सुरु केले असून दोन दिवसांपूर्वीच त्याचे उद्धाटन झाले. या उद्धाटन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सुझान खान, तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी, हृतिक रोशन आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादही सहभागी झाले होते. यासोबत त्यांचे इतर मित्रही यावेळी पार्टीत सहभागी झाले होते.

घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समांथाने शेअर केला नागाचैतन्यसोबतचा खास फोटो, म्हणाली…

अर्सलन गोणीने इन्स्टाग्रामवर सुझानसोबत पार्टीतील एक फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे. यावेळी अर्सलनने गर्लफ्रेंड सुझानला तिच्या नव्या हॉटेलबद्दल शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले आहे. तसेच तिच्या या नव्या सुरुवातीबद्दल तो फार आनंदी असल्याचे दिसत आहे. अर्सलनने शेअर केलेल्या या फोटोत ते दोघेही फार आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे.

“दाक्षिणात्य सिनेसृष्टीबद्दल मी…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या फोटोला कॅप्शन देताना अर्सलन म्हणाला, “डार्लिंग… नवीन रेस्टॉरंट घेतल्याबद्दल तुझे अभिनंदन.” यासोबत त्याने या पोस्टमध्ये सुझानलाही टॅग केले आहे. विशेष म्हणजे सुझाननेही त्याची ही पोस्ट पुन्हा शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर सुझानने ‘खूप खूप धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबत ही प्रतिक्रिया देताना तिने हार्ट आणि किस इमोजींचा वापर करत प्रेम व्यक्त केले आहे.

“काही नाती…”, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सुझान आणि अर्सलन या दोघांचीही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे दिसत आहे. या दोघांच्या पोस्टद्वारे चाहत्यांनी विविध अंदाज लावायला सुरुवात केली आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या या फोटोला लाईक्सही दिले आहेत.

दरम्यान हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arslan goni congratulates darling sussanne khan for her new restaurant in goa she replies with hearts and kisses nrp

ताज्या बातम्या