‘लेखकांना महत्त्व द्यायला हवं’

दिग्दर्शक अलेजांड्रो सामाजिक विषयावर चित्रपटांतून भाष्य करणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत.

मानसी जोशी, लोकसत्ता

‘धग’ या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या उषाने त्यानंतर ‘भूतनाथ रिटर्न्‍स’, ‘लाखों मे एक’, ‘वीरप्पन’ आणि ‘फायरब्रँड’ या चित्रपटांतून आपल्या दमदार भूमिका केल्या. तद्दन व्यावसायिक चित्रपटांतून काम न करता वेगळ्या कथानकांवरचे चित्रपट करत उषाने आपली वेगळी ओळख निर्माण के ली आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट- क्राईम नं. १०३/२०१५’ या चित्रपटात उषाने प्रभावती अम्माची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील विषयाची सहजसुंदर मांडणी, उत्कृष्ट छायाचित्रण आणि त्याच जोडीला कलाकारांचा अप्रतिम अभिनय अशा वैशिष्टय़ांमुळे अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षकांकडून त्याची दखल घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची उषाची ही पहिलीच वेळ नाही. याआधी याच चित्रपटासाठी तिला ‘साऊथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फे स्टिव्हल’ आणि ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (इफ्फी)मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. ‘‘कलाकार म्हणून आपल्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ‘माई घाट- क्राईम नंबर १०३/२०१५’ या चित्रपटातील भूमिकेसाठी चित्रपट समीक्षक तसेच प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. या प्रशंसेमुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. प्रभावती अम्माच्या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटते,’’ अशा शब्दांत तिने आपला आनंद व्यक्त के ला.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याने त्याचे खरेपण जपत भूमिका साकारणे जास्त आव्हानात्मक असल्याचे उषाला वाटते. पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची आई तेरा वर्षे झगडते. या तेरा वर्षांत तिच्या आयुष्यातील घडणाऱ्या घडामोडी, मृत पावलेल्या मुलाच्या न्यायासाठीचा संघर्ष यात मांडण्यात आला आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी उत्कृष्टरीत्या प्रभावती अम्मांची जीवनाची कथा पडद्यावर मांडली आहे, असे ती सांगते. ‘प्रभावती अम्मांच्या भूमिकेला भावनिक कंगोरे आहेत. ही भूमिका साकारताना त्यांचा संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या हावभाव, देहबोलीतून त्या आईचा न्यायासाठी असलेला संघर्ष कसा दाखवता येईल हाच विचार केला,’ असे तिने सांगितले.

‘इंडो जर्मन फिल्म वीक’मध्ये मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिने प्रथमच ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला. जगातील सर्व चित्रपट महोत्सव आता ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जात आहेत. करोनामुळे मनोरंजन सृष्टीतील झालेला बदल ही काळाची गरज असल्याचे मत तिने व्यक्त केले. नुक तेच स्पेनमध्ये मी अलेजांड्रो कोर्टेस दिग्दर्शित ‘ला नुएवा नोर्मेलिदाद’ या चित्रपटासाठी मुखपट्टी, सॅनिटायझर्स तसेच पीपीई कीटसहित चित्रीकरण केले. हा माझ्यासाठी नवीन अनुभव आहे, असे तिने सांगितले. टाळेबंदीच्या कालावधीत चित्रित झालेला हा चित्रपट वर्णभेदावर भाष्य करणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक अलेजांड्रो सामाजिक विषयावर चित्रपटांतून भाष्य करणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत.

मराठी चित्रपटांपासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय चित्रपटापर्यंत पोहोचलेली अभिनेत्री उषा जाधव पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘माई घाट – क्राईम नं. १०३/२०१५’ या चित्रपटासाठी तिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून याआधीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आता गेल्या आठवडय़ात तिला ‘इंडो जर्मन फिल्म वीक’ महोत्सवात याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. नुकतंच स्पेनमध्ये एका स्पॅनिश चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण के लेल्या उषाने नवनवीन कथा, आशय आपल्याला चित्रपटातून यायला हवा असेल तर लेखकांना महत्त्व देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त के ले.

‘ला नुएवा नोर्मेलिदाद’ चित्रपटाच्या निमित्ताने तिने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आले. तो अनुभव वेगळाच होता.  तेथील कामात एक प्रकारची शिस्त दिसून येते. अलेजांड्रो कोर्टेस हा दिग्दर्शक स्टोरीबोर्डशिवाय कामच करत नाही. ही त्याची गोष्ट मला विशेष भावली. तेथील लोकांकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपल्याकडे बऱ्याचदा सेटवरील लाईटमन, स्पॉटबॉय यांना आदराने वागवले जात नाही. तिथे मात्र कटाक्षाने या गोष्टी जपल्या जातात. अगदी लेखकांनाही तेवढेच महत्त्व दिले जात. आपल्याकडेही लेखकांना मानाने वागवले गेले पाहिजे. त्यांच्या मानधनात वाढ होणेही गरजेचे आहे. उषा जाधव

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article about marathi actress usha jadhav zws