‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टीम करते आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक के ले.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळये यांचा ‘माझा पुरस्कार’ सोहळा वर्षां निवासस्थानी पार पडला. ‘माझा पुरस्कारा’चे हे बारावे वर्ष होते, यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारांसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली होती. या सर्व कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते. ‘र्निबध कोणालाच आवडत नाहीत, या र्निबधांमुळे अनेकांना आजारानंतर निराशेने ग्रासले आहे. अशावेळी विनोदाचे महत्त्व पटते. यंत्राने आवाज करू नये, ते व्यवस्थित चालावे म्हणून आपण वंगण घालतो. त्याप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते’, असे सांगत चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी लेखक सचिन मोटे, निर्माता-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजीत ताम्हणकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सोनी टीव्हीचे अजय भाळवणकर, निर्माता – दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्य जत्राच्या टीममधील वनिता खरात, अमित फाळके, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान