एनसीबी कार्यालयात हजेरी दरम्यान आर्यनच्या हातातील पुस्तकावर खिळल्या सर्वांच्या नजरा, पाहा व्हिडीओ

यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्या हातातील पुस्तकावर खिळल्या.

मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला दोन दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात काढावे लागले. आर्यनची जामिनावर सुटका झाल्यानंतर मात्र त्याला कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करण्यासाठी काल आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर झाला. यावेळी आर्यनच्या हातातील पुस्तकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागेल, अशी अट कोर्टाने जामिनादरम्यान घातली होती. या अटीनुसार, आर्यन काल शुक्रवारी ५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर झाला. यावेळी त्यासह त्याचा पर्सनल बॉडीगार्डही उपस्थित होता. आर्यन हा सफेद रंगाच्या रेंज रोव्हर suv या गाडीतून एनसीबी ऑफिसमध्यो पोहोचला. यावेळी त्याने पिवळ्या रंगाचे स्वेटशर्ट घातले होते. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा या त्याच्या हातातील पुस्तकावर खिळल्या.

आर्यनच्या हातात चॉकलेटी रंगाचे कव्हर असलेले एक पुस्तक पाहायला मिळाले. त्याच्या हातात “द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू” या पुस्तकाची प्रत असल्याचे समोर आलं आहे. हे पुस्तक एका प्रतिष्ठीत लेखक आणि पत्रकार स्टीग लार्सन यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक psychological thriller या विभागात येते.

शुक्रवारी आर्यन हजेरी लावण्यासाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये येणार असल्याची माहिती आधीपासूनच प्रसारमाध्यमांना होती. आर्यन त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अनेकांनी त्याच्याभोवती गराडा केला. दरम्यात कोर्टाने घालून दिलेल्या नियमांमध्ये आर्यनने एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावली. नियमाप्रमाणे एनसीबी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर तो पुन्हा मन्नतकडे रवाना झाला.

पाहा व्हिडीओ :

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan appears before ncb in mumbai as per bail condition with some book nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन