मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सगळ्यांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे. यापैकी एक बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा देखील

रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पालक म्हणून, एक पालक म्हणून, चिंतेने रात्रभर त्यांना झोप न लागणं मी समजू शकते, एक मित्र म्हणून मी त्यांना सामर्थ्य आणि सकारात्मकता प्राप्त व्हावी अशी इच्छा व्यक्त करते, असे ट्वीट रवीनाने केले आहे. पुढे रवीना म्हणाली, तुम्हाला सगळ्यांना ही दिवाळी आनंदी आणि या जगाला प्रेम आणि शांती लाभो आशी आशा करते.

आणखी वाचा : ‘मुकुल रोहतगी यांच्यासारख्या वकिलाकडे…’, आर्यन खानच्या सुटकेनंतर राम गोपाल वर्मांचे ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

आर्यनसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”