scorecardresearch

‘एक पल का जीना’वर आशा भोसले यांनी केला हृतिकसारखा डान्स

व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल…

गायिका आशा भोसले आणि त्यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज तर सगळ्यांच्याच लक्षात आहे. मात्र, त्या एक उत्तम डान्सर आहेत हे अनेकांना ठावूक नाही. ८८ वय असूनही त्या उत्तम डान्स करतात, त्यांचा डान्स पाहिल्यावर अनेकांना तर आश्चर्यच होईल. सोशल मीडियावर त्यांच्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ, फिल्मफेअरच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आशा भोसले हृतिकच्या ‘एक पल का जीना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या हृतिकची सिग्नेचर स्टेप करत आहेत. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. याच कार्यक्रमात आशा भोसले यांनी डान्सकरून सगळ्यांना आश्चर्यचकीत केले आहे.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वसामान्स जनतेपासून कलाकारांपर्यंत अनेकांची कमेंट करत त्यांची स्तुती केली आहे.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली झाला. त्या ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यानंतर लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघांनी लहान वयातच गाणं गायला सुरूवात केली. आशा भोसले यांनी अभंग, भजन पासून बॉलिवूड स्टाईलपर्यंत अनेक प्रकारची गाणी गायली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asha bhosle dance s like hrithik roshan on ek pal ka jeena song video went viral dcp

ताज्या बातम्या