भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना करोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी देशाभरातून लोक प्रार्थना करत आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. अशातच लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांनी पहिल्यांदाच लतादीदींच्या प्रकृतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गायिका आशा भोसले यांनी बहीण लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. इ-टाइम्सशी बोलताना आशा भोसले म्हणाल्या, ‘रुग्णालयानं ठरवून दिलेल्या वेळाप्रत्रकाप्रमाणे लतादीदींना औषधं दिली जात आहेत. पण रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे दीदींना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मी त्यांना भेटण्यासाठी गेले होते पण त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली नाही. करोनाचं वाढतं संक्रमण पाहता रुग्णालयाकडून नियमांच काटेकोर पालन केलं जात आहे.’

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”
anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”

आणखी वाचा : Lata Mangeshkar Health Update : लतादीदी अजूनही ICUमध्ये, डॉक्टरांनी दिली प्रकृतीविषयी माहिती

आशा भोसले पुढे म्हणाल्या, ‘या दरम्यान माझी देखील तब्येत काहीशी ठीक नाही. मागच्या काही दिवसांपासून मलाही खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत आहे. पण हे बदलेल्या वातावरणामुळे आहे. मला करोनाची लागण झालेली नाही. दीदींच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत आहे. आता अगोदरच्या तुलनेत त्यांची प्रकृती चांगली आहे. आमची बहीण उषा मंगेशकर सातत्यानं दीदी आणि माझ्या संपर्कात असून ती आम्हाला दीदींच्या प्रकृतीची माहिती देत असते.’

दरम्यान ‘गायिका लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्ये आहेत. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे’ अशी माहिती दीदींवर उपचार करत असलेले डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता मंगेशकर या ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली.