प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या अभिनयाने अनेक वर्ष बॉलीवूडवर राज्य केलं. त्यांना नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्कर देऊन गौरविण्यात आलं. कोणत्याही चित्रपटासाठी प्रत्येक अभिनेत्याची पहिली पसंती आशा पारेख यांनाच असायची. अभिन्याबरोबरच त्यांनी त्यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांचं नृत्य पडद्यावर पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी असायची. पण हल्लीच्या चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या नृत्यावर त्या नाखुश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : अक्षय कुमार झाला हृतिक रोशनच्या आलिशान घराचा मालक?

‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टन’मध्ये मुलाखतीच्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मुळाला विसरत चालली आहे, आपल्या संस्कृतीचं भान त्यांना राहिलं नाही. पण संजय लीला भन्साळी याला आपवाद आहेत, असं मत त्यांनी मांडलं. त्यासोबतच त्यांनी बॉलीवूड चित्रपटातील नृत्य आणि हल्ली तयार केली जाणारी रिमिक्स याबद्दलही भाष्य केलं. रिमिक्समुळे मूळ गाण्यातला गोडवाच काढून घेतला जातो. ओरीजनल गाण्याची मजा रीमिक्समध्ये नसते. रीमिक्स करतात तेव्हा फक्त ड्रम्स वाजवतात,आणि मग त्यातला शब्दांचा गोडवा निघून जातो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

त्या म्हणाल्या, “आपण आपली भारतीय नृत्यकला विसरत चाललो आहोत. आपण पाश्चिमात्य नृत्याची नक्कल करत आहोत. पण संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आजही आपल्या नृत्यपरंपरेची झलक दिसते. आजकाल चित्रपटात दाखवलं जाणारं नृत्य हे आपलं नाही. आपल्या नृत्याला समृद्ध परंपरा आहे. आपल्याकडे प्रत्येक राज्याची आपली अशी एक नृत्यशैली आहे. पण आपण पाश्चिमात्य नृत्याची नक्कल करत आहोत. हे पाहून मला मनातून खूप दुःख होतं.”

हेही वाचा : विवाहित दिग्दर्शकाशी अफेअर, लग्न न करण्याचा निर्णय अन्…; आयुष्यभर एकट्याच राहिल्या आशा पारेख

१९५२ मध्ये ‘आसमाँ’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर दोन वर्षांनी बिमल रॉय यांच्या ‘बाप-बेटी’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. मात्र, नायिका म्हणून त्यांच्या कारकीर्दीस नासीर हुसेन यांच्या १९५९ च्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटाने प्रारंभ झाला. १९९० च्या अखेरीस आशा पारेख यांनी निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही कारकीर्द गाजवली. २०१७ मध्ये प्रसिद्ध चित्रपट समीक्षक खालिद मोहम्मद यांच्यासह सहलेखन केलेले त्यांचे ‘द हिट गर्ल’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha parekh expressed her disappointment over current bollywood dance rnv
First published on: 01-10-2022 at 09:46 IST