ओळखलात का चित्रपट? ३२ वर्षांनंतरही लोकप्रियता कायम

हा चित्रपट अनेकदा पाहिला तरी मन भरत नाही आणि कंटाळाही येत नाही.

कितीही वर्षे झाली तरी काही चित्रपटांची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही. अनेक वर्षांनंतरही तो चित्रपट पाहिला तरी कंटाळा येत नाही. असाच एक चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीतील एक सोनेरी पान मानलं जातं. हा चित्रपट अनेकदा पाहिला तरी मन भरत नाही आणि कंटाळाही येत नाही. या चित्रपटाच्या टीमचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो आणि त्यातील कलाकार पाहताक्षणी ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट लक्षात येतो. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ राय, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, विजू खोटे असे सर्व कलाकार या फोटोत पाहायला मिळत आहेत.

मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो वा जागतिक किर्तीचा क्रिकेटमधील देव भारतरत्न सचिन तेंडुलकर असो ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट या सर्वाच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो आणि आजचा इंटरनेटचा जमाना यात जमीन-अस्मानाचे अंतर असले तरी नेटकऱ्यांची पसंती या चित्रपटाला मिळाली आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ashi hi banva banvi team old pic going viral laxmikant berde sachin pilgaonkar ashok saraf nivedita saraf ssv

ताज्या बातम्या