Ashneer Grover On Salman Khan Viral Video : अभिनेता सलमान खान याचा प्रसिद्ध शो बिग बॉस १८ संपले असून हे सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलेच चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस शोच्या ‘वीकेंड का वॉर’ एपिसोडमध्ये शार्ट टँक इंडियाचे माजी जज आणि भारतपे ते सहसंस्थापक अशनीर ग्रोवर देखील सहभागी झाले होते. जेव्हा अशनीर ग्रोवर स्टेजवर आले तेव्हा सलमान खानने पूर्वी केलेल्या काही विधानांवरून अशनीर ग्रोवर यांना काही प्रश्न विचारले होते. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता ग्रोवर यांनी सलमान खानला प्रत्युत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

अशनीर ग्रोवर यांचा एक नवा व्हिडीओ समोऱ आला आहे. या व्हिडीओमध्ये ग्रोवर सलमान खानवर भाष्य करताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी सलमान खानवर विनाकारण वाद घातल्याचा तसेच ड्रामा केल्याचा आरोप केला आहे. अशनीर ग्रोवर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अशनीर ग्रोवर हे एनआयटी कुरुक्षेत्र येथे विद्यार्थ्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.

“फालतू पंगा घेऊन त्याने उगाचच स्पर्धक उभा केला. मी तर शांततेत गेलो होतो, मला बोललं आणि ड्रामा क्रिएट करण्यासाठी तुम्ही म्हणता की, मी तुम्हाला कधी भेटलोच नाही, मला तर तुमचं नावही माहिती नाही… अरे नावही माहिती नाही तर मग बोलवलं कशाला?”

बिग बॉस १८ मध्ये सलमान खान यांनी आपण अशनीर ग्रोवर यांना पूर्वी कधीच भेटलो नसल्याचे म्हटले होते. यावर अशनीर ग्रोवर म्हणाले की, “मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर माझ्या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर होतात आणि मला न भेटता ब्रँड अॅम्बेसेडर व्हाल असं तर होऊ शकत नाही. मी देखील कमीन्या व्यक्तीप्रमाणे कंपनी चालवत होतो, सगळं माझ्या माध्यमातूनच होत होतं.”

नेमकं प्रकरण काय आहे?

पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अशनीर ग्रोवर यांनी सलमान खान बद्दलच्या एका प्रसंगाचा उल्लेख केला होता.ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी ते सलमान खानला भेटली होते आणि सलमान खानच्या मॅनेजरने त्यांना सांगितलं होतं की सलमान त्यांच्याबरोबर फोटो काढणार नाही. बिग बॉस १८ मध्ये सलमान खानने याबद्दल अशनीर ग्रोवर यांना सर्वांसमोरच प्रश्न विचारले होते.

सलमान तेव्हा म्हणालेला की, बैठक तुमच्याबरोबर नाही तर तुमच्या टीमबरोबर झाली होती. तुम्ही तेथे उपस्थित असाल, मात्र आपण कोणतीही चर्चा केली नव्हती. मला समजलं की तुम्ही म्हणालात आम्ही तुम्हाला मूर्ख बनवलं, हे चुकीचं आहे. ते आकडे चुकीचे होते.” असनीर यांनी यावेळी गप्प राहून सलमान खानला त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करणं सगळ्यात योग्य निर्णय असल्याचंही सांगितलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी सलमान खानची माफी देखील मागितली होती. दरम्यान आता अशनीर ग्रोवर यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashneer grover hits back at salman khan over bigg boss 18 episode drama video goes viral rak