मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदाच्या वर्षी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. अशोक मामांचे लाखो चाहते आहेत. फक्त आजी-आजोबा, आई-बाबा नाही तर तरुणांना अशोक सराफ आणि त्यांच्या भूमिकांचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर अशोक सराफ यांचे अनेक मीम्स व्हायरल होत असतात. अशाच एका मीम्स बनवणाऱ्याला अशोक सराफ यांना भेटण्याची संधी मिळाली आणि इतकचं काय तर तो चक्क अशोक सराफ यांच्या घरी गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

अशोक मामांची भेट घेतल्याचा अनुभव सांगण्यासाठी आम्ही मीमकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. आम्ही मीमकरने अशोक सराफ यांच्या सोबतचा त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो अशोक यांच्या घरी असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत “धनंजय माने विथ ओरिजनल धनंजय माने. लहानपणापासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न आज पूर्ण झालंय. ज्या विनोदवीराचे चित्रपट पाहत लहानाचा मोठा झालो, ज्यांच्या संवादामधून प्रेरणा घेऊन मीम्स बनवायला लागलो त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या सुपरस्टार, विनोदाचे बादशाह, आपल्या अफलातून टायमिंगने कोणत्याही विनोदाला न्याय देणारे आपल्या सर्वांचे लाडके धनंजय माने म्हणजेच माननीय अशोकमामा ह्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन भेटता आलं आणि यासाठी मी सर्वप्रथम झीमराठीचे अगदी मनापासून आभार मानतो”, असे आम्ही मीमकर म्हणाला.

आणखी वाचा : “ऋषीजी गेल्यानंतर तुम्ही खूप फिरत आहात”; नीतू कपूर यांच्या ‘या’ व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

आणखी वाचा : शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटात होणार विजय सेतुपतीची एण्ट्री, ‘या’ अभिनेत्याची घेणार जागा

पुढे तो म्हणाला, “कोणत्याही सेलिब्रिटीला भेटायचं म्हणजे मनावर थोडं दडपण येतंच आणि त्यात ते सेलिब्रिटी अशोक मामा आणि निवेदिता मॅडम असतील तर काही विचारूच नका. सुरुवातीला थोडी धाकधुक होती पण त्यांच्याशी बोलायला लागल्यावर सगळी भीती एका क्षणांत पळून गेली आणि सुमारे दोन तास त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारता आल्या. मी मागे एकदा म्हटलं होतं की मराठी कलाकारांचा साधेपणा प्रत्येक मराठी माणसाला आपलंसं करतो. आज पुन्हा एकदा तोच अनुभव आला. आपण स्वतः कुणी मोठे असल्याचा भाव अजिबात न बाळगता त्यांनी आमच्याशी अगदी आपुलकीने गप्पा मारल्या. अशोक मामा आणि निवेदिता ताईंनी तर आमचे आधीचे मीम्स सुद्धा आवर्जून पाहिले आणि अशोक मामांनी ह्युमर कसा असावा, विनोद करताना त्यात विरोधाभास असणं किती महत्वाचं आहे, याबाबत खूप छान मार्गदर्शन केलं. आमच्या मीमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच हे सगळं शिकायला मिळणं हे आमच्यासाठी खूपच फायद्याचं होतं.”

आणखी वाचा : “जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात, तोपर्यंत…”; प्रसाद ओकने सांगितला सेटवरील ‘तो’ किस्सा

पुढे त्यांच्या भेटीविषयी सांगताना तो म्हणाला, “आम्ही मीमकरच्या वतीने अशोक मामांच्या चित्रपटातील संवाद असलेले टीशर्ट त्यांना भेट म्हणून दिले आणि ते टीशर्ट पाहून त्यांना आणि निवेदिता ताईंना फार आनंद झाला. आज इतकी वर्ष होऊनसुद्धा आताची तरुण पिढी त्यांचे जुने चित्रपट तेवढ्याच उत्साहात पाहतात हीच त्यांची ऊर्जा असल्याचं निवेदिता ताईंनी सांगितलं. निघताना त्यांनी आम्हाला ‘बहुरूपी अशोक’ हे पुस्तक स्वतः सही करून स्वतःच्या हाताने भेट म्हणून दिलं आणि इथेच आम्हाला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. आयुष्याभर मिरवणार एखाद्या दागिन्या सारखं.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf and nivedita saraf memer adimin of aamhimemekar page dcp
First published on: 06-07-2022 at 17:47 IST