ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडून आज (बुधवार) भाजपामध्ये प्रवेश केला. गेली १८ वर्षे ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मात्र अंतर्गत मतभेतांमुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणावर आता बॉलिवूड चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अशोक पंडित?

“जा शिंदे जा जी ले अपनी जिंदगी, माँ बेटे की ग़ुलामी करना तेरे बस की बात नहीं !” अशा शब्दात ट्विटच्या माध्यमातून अशोक पंडित यांनी काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली आहे.

‘मैने गांधी को नहीं मारा’, ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘सी कंपनी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे अशोक पंडित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आवाक् करणारी बाब म्हणजे गेल्या काही काळात ते आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहातात. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.