‘शेतकरी नाही तर…’; असिम रियाजचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

२६ नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आहे. दिल्ली सीमेवर सध्या हे आंदोलन सुरु असून देशभरात अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. यामध्येच अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. यात ‘बिग बॉस१३’फेम अभिनेता असिम रियाजनेदेखील शेतकऱ्यांना खंबीरपणे पाठिंबा दिला आहे.

असिमने सोशल मीडियावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच त्याला समर्पक अशी कॅप्शनदेखील दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर असिमच्या या कॅप्शनची चर्चा रंगली आहे.

“शेतकरी नाही तर अन्न नाही आणि भविष्यदेखील नाही”, असं कॅप्शन असिमने या फोटोला दिलं आहे. असिम अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे विचार व्यक्त करत असतो. असिम कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, ‘बिग बॉस १३’मुळे प्रकाशझोतात आला.

दरम्यान, आतापर्यंत कलाविश्वातील अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. यात सोनम कपूर, आनंद आहुजा, सनी देओल, रुपिंदर हांडा,दिलजीत दोसांज, हंसल मेहता, अनुभव सिन्हा अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Asim riaz supports farmers says no farmers no food no future tweet goes viral ssj

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!