बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी मागच्या काही काळापासून भारतीय क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. हे दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करताना दिसते. तसेच एकमेकांच्या पोस्टवर कमेंटही करताना दिसतात. या दोघांच्या जोडीला चाहत्यांचंही भरभरून प्रेम मिळताना दिसतं. आताही काहीसं असंच घडलंय आथियानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले काही फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहेत. आथिया शेट्टी अनेकदा केएल राहुलचे टी-शर्ट किंवा हूडीज घालताना दिसते. आताही तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिनं राहुलची हूडी घातली आहे. या ओव्हरसाइज्ड हूडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर केएल राहुलनं देखील त्यावर कमेंट केली आहे. आथियानं घातलेल्या या हूडीचं कौतुक करताना त्यानं लिहिलं, 'हूडी छान आहे.' राहुलच्या या कमेंटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. केएल राहुलनं आथियाच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर आथियानं त्याचीच हूडी घातल्याचं स्पष्ट झालं आहे. एका युजरनं या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, 'केएल राहुल आणि त्याच्या गर्लफ्रेंडनं एकसारखी हूडी घातली आहे.' याशिवाय इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी आथियाच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. अर्थात या आधीही आथियानं केएल राहुलचे टी-शर्ट घातल्यांतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. दोघंही अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप'च्या प्रिमियरला सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी त्याचं शेट्टी कुटुंबीयांशी किती चांगलं बॉन्डिंग आहे हे देखील पाहायला मिळालं.