‘एक लडकी को दो लडके मिल जाएंगे तो…’; ‘अतरंगी रे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

atrangi re, atrangi re trailer, akshay kumar, sara ali khan, dhanush, akshay kumar atrangi re, sara ali khan atrangi re, dhanush atrangi re, atrangi re trailer launch, akshay kumar news, dhanush news, sara ali khan news,

सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा ‘अतरंगी रे’ चित्रपट चर्चेत आहे. काल या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. ते पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या ३ मिनिटे आठ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषचे अपहरण करुन साराशी लग्न करण्यासाठी आणण्यात आल्याचे दाखवले आहे. पण सारा लग्नाला तयार नसते. कुटुंबीय जबदरस्तीने साराचे लग्न धनुषशी लावून देतात. त्यानंतर सारा आणि धनुष दिल्लीला जातात. तेव्हा त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि त्याच वेळी अक्षय कुमारची एण्ट्री होते. साराचे अक्षयवर प्रचंड प्रेम असते. एकंदरीत ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
आणखी वाचा : शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत

यापूर्वी ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचे तीन टीझर पोस्टर समोर आले होते. या पोस्टरच्या माध्यामातून दिग्दर्शक आनंद एल राय यांनी आपल्या चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर मांडल्या होत्या. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा बहुचर्चित आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होता. आता चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. हा ट्रेलर आता पर्यंत १ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Atrangi re trailer sara ali khan wants both akshay kumar and dhanush as lovers avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या