प्रदर्शनाआधीच भारतात 'अवतार २'चा जलवा, केली 'इतक्या' कोटींची कमाई | audience in india excited for avtar 2 release producers have earned huge amount from advance booking | Loksatta

प्रदर्शनाआधीच भारतात ‘अवतार २’चा जलवा, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘अवतार २’ प्रदर्शित व्हायला अजून १४ दिवस बाकी आहेत.

प्रदर्शनाआधीच भारतात ‘अवतार २’चा जलवा, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आज तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दूसरा भाग येत आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच करोडो रुपयांची कमाई केली असल्याचं समोर आलं आहे.

गेल्याच महिन्यात २००९ साली आलेला ‘अवतार’ चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित केला होता आणि या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. त्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानेही रिलीजच्या आधीच रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची रक्कम समोर आली आहे.

आणखी वाचा : Video: “तू खोटारडी…”; अमिताभ बच्चन यांनी काजोलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

‘अवतार २’ प्रदर्शित व्हायला अजून १४ दिवस बाकी आहेत. तरी आत्ताच भारतात या चित्रपटाची १ लाख १२१ तिकीटं विकली गेली आहेत. यात ८४ हजारांहून अधिक तिकीटं ३डीची आहेत. ही सगळी तिकीटं विकून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी भारतात ४.२४ कोटींची कमाई केली आहे. तसंच लवकरच हा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमधून ५ कोटींची कमाई करेल.

हेही वाचा : बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

‘अवतार २’ने अॅडव्हान्स बुकिंगमधून केलेल्या कामईचा आकडा समोर आल्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘अवतार’चा हा दूसरा भाग २० डिसेंबर २०२२ या दिवशी चित्रपटगृहात झळकणार आहे. शिवाय येणाऱ्या काही वर्षात या चित्रपटाचे आणखी ३ भाग बघायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 15:38 IST
Next Story
‘गदर’ चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मानेही केलं होतं काम, शूटिंगदरम्यान क्रू मेंबर्सनी शिव्या दिल्या अन्…