जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची गेले अनेक दवास सगळीकडेच चर्चा आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दूसरा भाग गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात विक्रमी कामगिरी केली आहे.

या चित्रपटाची कथा, व्हीएफएक्स, कलाकारांचा अभिनय या सर्वांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. जगभरातून या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये उत्तम कलेक्शन केले आहे. आता हा चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स एण्डगेम’ला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
Crew box office collection day 1
‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

आणखी वाचा : ‘पठाण’च्या पहिल्या शोची तिकिटं मिळत नसल्याने चाहत्याने थेट घेतली किंग खानकडे धाव, अजब मागणी ऐकून शाहरुख म्हणाला…

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक ट्वीट करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “‘अवतार २’ने इतिहास रचला. अ‍ॅव्हेंजर्स एण्डगेम’च्या कमाईचा रेकॉर्ड मोडत ‘अवतार २’ हा भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ३६८.२० कोटींची कमाई केली आहे. तर या आधी अ‍ॅव्हेंजर्स एण्डगेम’ने भारतात ३६७ कोटींची कमाई केली होती.” त्यामुळे ३६८.२० कोटींचा गल्ला जमवत हा चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा : प्रदर्शनाआधीच भारतात ‘अवतार २’चा जलवा, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ ही पांडोरा ग्रहाची एक काल्पनिक कथा आहे. यात एक माणूस जेक सुली नाविक बनून तिथे जातो आणि त्या जमातीच्या राजकुमारीशी लग्न करून तिथेच स्थायिक होतो. तर आता त्याला मुले झाली आहेत आणि पुन्हा या ग्रहावर माणसांनी हल्ला केला आहे. तो हल्ला जेक सुली कसा परतवून लावतो हे या चित्रपटात पाहायला मिळते.