scorecardresearch

‘असा’ तयार करण्यात आला ‘अवतार २’, चित्रपटाच्या मेकिंगचा भारावून टाकणारा व्हिडीओ पाहिलात का?

‘अवतार २’च्या मेकिंगचा हा व्हिडीओ पाहून खरोखरच थक्क व्हायला होतं.

‘असा’ तयार करण्यात आला ‘अवतार २’, चित्रपटाच्या मेकिंगचा भारावून टाकणारा व्हिडीओ पाहिलात का?

हॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार: द वे ऑफ वाटर’ अखेर काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासून याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. आता या चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली. ॲडव्हान्स बुकिंग मधून या चित्रपटाने ४ कोटी रुपये कमावले. तर त्याच पाठोपाठ आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘अवतार २’मध्ये दाखवलेलं सुंदर जग पाहून हा चित्रपट कसा तयार करण्यात आला याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. अखेर या चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. द अकॅडमीच्या व्हेरिफाइड इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘अवतार २’चा सर्वत्र बोलबाला, ‘दृश्यम २’चा रेकॉर्ड मोडत पहिल्या दिवशी जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हा व्हिडीओ दोन भागांमध्ये विभागला असून वरच्या बाजूला चित्रपटातील दृश्य दिसत आहेत, तर त्याच्या खालोखाल ही दृश्य कशी चित्रित करण्यात आली हे दाखवलं आहे. व्हीएफएक्सच्या सहाय्याने एका बंद खोलीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. अनेक तंत्रज्ञांच्या सहाय्याने एका विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करून, चेहऱ्यासमोर माईक लावून हा चित्रपट शूट करण्यात आला. ‘अवतार २’च्या मेकिंगचा हा व्हिडीओ पाहून खरोखरच थक्क व्हायला होतं.

आणखी वाचा : ‘अवतार २’ला मोठा फटका, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाईन साईट्सवर लीक

‘अवतार २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘अवतार २’चा हा रेकॉर्ड बघता दोन-चार दिवसातच तो १०० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 17:06 IST

संबंधित बातम्या