‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ची भारतात रेकॉर्डब्रेक कमाई, १३ दिवसांत तब्बल २०० कोटींची कमाई

फक्त १३ दिवसांत चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार करत भारतात सर्वाधिक कमाई करणार हॉलिवूडपट ठरला आहे

हॉलिवूड चित्रपट ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. फक्त १३ दिवसांत चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार करत भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी ३१.३३ कोटींची कमाई करत चित्रपटाने ‘बागी २’ आणि ‘पद्मावत’चा रेकॉर्ड मोडला होता. फक्त चार दिवसातच चित्रपटाने १०० कोटींची कमाई करत आधीच रेकॉर्ड केला होता.

‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ने कमाईच्या बाबतीच इतिहास रचला असून फक्त १३ दिवसांत २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसनुसार, चित्रपटाने एकूण २००.२५ कोटींची कमाई केली आहे. एखाद्या हॉलिवूडपटासाठी हा आकडा अत्यंत मोठा आहे.

‘इन्फिनिटी वॉर’ हा एमसीव्हीचा फेस १ मधील शेवटचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या पटकथेची सुरूवात २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आर्यनमॅन सिनेमापासून झाली. या चित्रपटानंतर ‘आर्यनमॅन’, ‘अॅवेंजर्स’, ‘थॉर’ असे एकाहून एक सरस तब्बल १५ सिनेमांमधून ‘इनफिनिटी वॉर’ची पार्श्वभूमी तयार करण्यात आली आहे.

या सर्व सिनेमांमुळे सुपरहिरोंबद्दलची कमालीची उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती. या सिनेमात रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर, क्रिस हेम्सवर्थ, मार्क रुफैलो, स्कारलेट योहानसन, बेनेडिक्ट कम्बरबाक, चॅडविक बोसमॅन, एलिजाबेथ ओस्लन, जेव बतिस्ता, जो सल्डाना, क्रिस प्रैट आणि जोश ब्रोलिन लीड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमात खलनायक आणि नायकांचे युद्ध दाखवण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Avengers infinity war reaches 200 crore mark in just 13 days