‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र, ट्रेलर पाहिल्यानंतर रणबीरला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलरमध्ये रणबीर कपूरला एका सीनसाठी ट्रोल करण्यात आले होते, ज्यामध्ये अभिनेता मंदिराच्या आत शूज परिधान करतो.

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

अयान मुखर्जीने स्पष्ट केले

अलीकडेच, चित्रपटाच्या दिग्दर्शक अयान मुखर्जीने त्याच्या इन्स्टाग्रामर हँडलवर स्पष्ट केले की रणबीरने मंदिराच्या सीनमध्ये बूट का घातले होते? यासोबतच त्याने चाहत्यांना असेही सांगितले की आता ट्रेलर 4K मध्ये देखील रिलीज झाला आहे. अयान मुखर्जीने लिहिले की, “आमच्या ट्रेलरमध्ये एका सीनमुळे काही लोक नाराज झाले होते. रणबीरच्या पात्राने शूज घातले आहेत. या चित्रपटाचा निर्माता या नात्याने मी सांगू इच्छितो की, आमच्या चित्रपटात रणबीर मंदिरात प्रवेश करत नसून दुर्गा पूजा पंडालमध्ये प्रवेश करत आहे. माझे स्वतःचे कुटुंब ७५ वर्षांपासून अशाच दुर्गापूजेचे आयोजन करत आहे. मी लहानपणापासून त्याचा एक भाग आहे. माझ्या अनुभवानुसार, आम्ही देवीच्या स्टेजवर जाण्यापूर्वीच बूट काढतो, तुम्ही पंडालमध्ये गेल्यावर नाही.’

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : अग्निपथ योजनेचा विरोध करणाऱ्यांवर भडकली कंगना, पोस्ट शेअर करत म्हणाली…

अयान मुखर्जी मंदिराच्या दृश्यावर बोलत आहे

अयान पुढे म्हणाला, “प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणे माझ्यासाठी खास आहे, कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’ ही भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा आदर करताना साजरी करणारी भावना आहे. यामुळेच मी हा चित्रपट बनवला आहे, म्हणूनच ‘ब्रह्मास्त्र’ पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयापर्यंत ही भावना पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त ‘ब्रह्मास्त्र’मध्ये नागार्जुन, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.