‘राबता’ चित्रपटानंतर अभिनेत्री क्रिती सनॉनचा आगामी ‘बरेली की बर्फी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि क्रिती सनॉनची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बरेली की बर्फी’मधील ‘ट्विस्ट कमरिया’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. याआधी प्रदर्शित झालेला ‘स्वीटी तेरा ड्रामा’ हे गाणं लोकांच्या प्ले लिस्टमध्ये जागा घेतोय तोवर हे आणखी एक देसी पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
‘स्वीटी तेरा ड्रामा’ हेसुद्धा लग्नसोहळ्यातील गाणं होतं ज्यामध्ये क्रिती, आयुषमान आणि राजकुमार ठुमके लावताना दिसले. पण ‘ट्विस्ट कमरिया’ गाण्यात आयुषमान आणि क्रितीचा अफलातून डान्स पाहायला मिळतोय. हर्षदीप कौर, यासीर देसाई, तनिष्क आणि अल्तमशच्या आवाजातील या गाण्याला तनिष्क बागची-वायूने संगीतबद्ध केलंय. या गाण्यात बिट्टी म्हणजेच क्रिती आणि चिराग म्हणजेच आयुषमान लग्नात नाचताना दिसत आहेत. याला एक ‘परफेक्ट वेडींग साँग’ म्हणता येईल.




वाचा : जेव्हा भिकारी दिलीप जोशींना ‘जेठालाल’ म्हणून हाक मारतो
या चित्रपटात बिट्टी आपल्यासाठी परफेक्ट जोडीदार शोधत असते. आपण जसे आहोत तसे स्वीकारणाऱ्या मुलाच्या शोधात बिट्टी असते. यानंतर तिच्या आयुष्यात चिराग दुबे म्हणजेच आयुषमान खुरानाची एण्ट्री होते. दोघांमध्ये प्रेम फुलू लागताच तिसरा व्यक्ती म्हणजेच राजकुमार रावची एण्ट्री होते. अश्विनी अय्यर-तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. येत्या १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.