scorecardresearch

सिनेमा चालले नाहीत तर मी पार्ट्यांमध्ये गाणं गायचं आणि डान्स करायचं ठरवलं होतं”; आयुष्यमान खुरानाचा खुलासा

आज आयुष्यमानने नाव कमावलं असलं तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात आयुष्यमानला देखील मोठा संघर्ष करावा लागलाय.

ayushman-khurana
Photo-Loksatta file

अभिनेता आयुष्यमान खुराणाने त्याच्या अनोख्या अभिनयाच्या खास अंदाजाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा करत आयुष्यमानने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. आज आयुष्यमानने नाव कमावलं असलं तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात आयुष्यमानला देखील मोठा संघर्ष करावा लागलाय. अरबाज खानच्या ‘पिंच-2’ या शोमध्ये आयुष्यमानने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये जर यश मिळालं नसतं तर आपण पार्ट्यांमध्ये गाणं गाण्यासाठी आणि डान्स करण्यासाठी देखील तयार होतो असं आयुष्यमान म्हणालाय.

‘विकी डोनर’ या सिनेमातून आयुष्यमान खुरानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाच्या अवघ्या तीन वर्षांत नंतरच आयुष्यमान ने ‘क्रॅकिंग कोड:माय जर्नी इन बॉलीवूड ‘ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. 2015 सालामध्ये आयुष्यमानच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. कारकिर्दीचा सुरुवातीला आयुष्यमानने आत्मचरित्र लिहिल्याने सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. ‘पिंच-2’ या शोमध्ये अरबाज खानने ट्विटरवरील आयुष्यमान वर टीका करणारे काही ट्वीट वाचून दाखवले.

या ट्वीटवर प्रतिक्रिया देत आयुष्यमान खुराणा म्हणाला, “माझ्या पहिल्या चित्रपटा नंतर, माझे तीन सिनेमा बॅक-टू-बॅक फ्लॉप गेले. लोक माझ्याबद्दल लिहू लागले होते. मी पुन्हा घरी जाण्याचा विचार करत होतो. त्यावेळी मी अशा स्थितीतून जात होतो की माझ्याकडे वेळही होता म्हणून मी पुस्तक लिहिले.”

पुढे तो म्हणाला, “पण आता मी अशा टप्प्यावर आहे जिथे माझ्याकडे पुस्तक लिहायला वेळ नाही आणि कामही व्यवस्थित चालू आहे. त्यावेळी काहीही काम नव्हतं. माझा एक बँड होता. मी विचार केला जरी माझे सिनेमा चालले नाहीत तर मी बर्थडे पार्टी किंवा इतर पार्ट्यांमध्ये गाणं गाऊन किंवा डान्स करून लोकांचं मनोरंजन करेन. माझे सिनेमा चालले नाहीत तर मी कोण कोणत्या गोष्टी करू शकतो याचा विचार मी सतत करायचो.” असं आयुष्यमान म्हणाला.

आयुष्यमान खुराणा सध्या भोपाळमध्ये ‘जी- डॉक्टर’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच अनुभव सिंहाच्या ‘अनेक’ या सिनेमातून देखील तो झळकणार आहे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2021 at 15:35 IST

संबंधित बातम्या