‘तू मुसलमान आहेस का ?’; युजरने विचारलेल्या प्रश्नावर बाबिल खानने दिलं ‘हे’ उत्तर…

वडील इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा बाबिल खान पुन्हा चर्चेत आलाय. या चर्चेचं कारण त्याने एका युजरच्या प्रश्नावर दिलेलं सणसणीत उत्तर होय.

babil-khan-answered-user-asks-his-religion

दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान हा त्याच्या सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी तो सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत असतो. कधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तर कधी चाहत्यांच्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. वडील इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा बाबिल खान पुन्हा चर्चेत आलाय. या चर्चेचं कारण त्याने एका युजरच्या प्रश्नावर दिलेलं सणसणीत उत्तर होय. ‘तू मुसलमान आहे का?’ असं एका युजरने प्रश्न विचारल्यानंतर बाबिल खानने जे उत्तर दिलं त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरूय.

या प्रश्न आणि उत्तराचं एक स्क्रीनशॉट बाबिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. यात युजरने बाबिलला विचारलं. “तू मुस्लिम आहेस का?” थेट आपल्या धर्मावर केलेल्या या प्रश्नाला टाळण्याऐवजी बाबिलने त्याच्या खास अंदाजात आणि तितकंच दमदार उत्तर दिलंय. धर्मावर केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाबिलने लिहिलं, “मी कोणत्या धर्माचा नाही. मी बायबल, भगवद् गीता, कुराण वाचलं आहे आणि आता गुरु ग्रंथ साह‍िब वाचायला घेतलं आहे…मी सगळ्याच धर्माचा आहे…आपण एकमेकांना ज्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मदत करतो, तोच आपल्या धर्माचा आधार आहे.”

बाबिल प्रमाणेच त्याचे वडील दिवंगत इरफान खान हे सुद्धा धर्माच्या बाबतीत व्यक्त होत असायचे. त्यांनी कोणत्या धर्माची वाहवा केली नाही तसंच कोणत्या धर्माचा अपमानही केला नाही. इरफान कायम माणूसकीला सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ मानत होते. आज बाबिलने सुद्धा युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या वडिलांच्या विचारांची परंपरा पुढे नेली. धर्माबाबत युजरने केलेल्या या प्रश्नावर बाबिलने दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरूय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Babil khan answered user asks his religion irrfan khan son gives epic reply prp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या