वाघिण मुंबईत येतेय दम असेल तर रोखून दाखवा, बबिता फोगाटचा कंगनाला पाठिंबा

बबिताचे ट्विट सध्या चर्चेत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर सोशल मीडियावर कंगना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट केले असून धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असे कंगनाने म्हटले. आता कंगनाला दंगल गर्ल बबिता फोगाटनं पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा- ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा – कंगना रणौत

बबिताने कंगनाच्या ट्विटला रिट्विट करत वाघिण मुंबईत येते रोखून दाखवा असे म्हणत तिला पाठिंबा दिला आहे. ‘वाघिण ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. दम असेल तर रोखून दाखवा. वेळच ठरवेल’ असे बबिताने ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- मुंबईवरुन निर्माण झालेला नेमका वाद काय आणि कंगनाविरोधात संताप का व्यक्त होतोय?

काय होते कंगनाचे ट्विट?
‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Babita phogat support kangana ranaut avb

ताज्या बातम्या