scorecardresearch

Viral मेकओव्हरची जादु! फुगे विकणारी झाली मॉडेल

सध्या या फुगे विकणारीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

balloon seller girl, kerala road balloon seller girl,
सध्या या फुगे विकणारीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आपण सोशल मीडियावर एका ६० वर्षीय मजूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहिला. फक्त एक मेकओव्हर आणि एका दिवसात तो मजूर मॉडेल झाला. हा मजूर कर्णाटकातल्या एका कपड्याच्या ब्रॅंडसाठी मॉडेल म्हणून काम करत होता. तसाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

यावेळी केरळमधील एका फुगे विकणाऱ्या मुलीचा मेकओव्हरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलीचं नाव किसबू असं आहे. किसबू मंदिराजवळ फुगे विकत असताना फोटोग्राफर अर्जुन कृष्णनने तिला पाहिलं. त्याने त्यानंतर त्याने किसबूचे काही फोटो काढले. तर मेकओव्हरनंतरचे तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : ‘झुंड’ पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर येताच अनुराग कश्यपने नागराज मंजुळेंना मारली मिठी; म्हणाला “मी आतापर्यंत…”

आणखी वाचा : …म्हणून समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत

तिचा हा फोटो अर्जुन कृष्ण शेअर करत अंदलूरच्या गल्लीतून लोकांच्या हृदयापर्यंत…आणि मेकओव्हर झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे ते हसू, असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत ती कोणत्याही मॉडेल पेक्षा कमी नाही असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Balloon seller girl from kerala road become an overnight star and model dcp

ताज्या बातम्या