PHOTO : दीपिका पदुकोणचा ‘रॉयल’ अंदाज

फोटोशूटमधील तिचा लूक पाहून परिकथांमधील राजकुमारीची नक्की आठवण येईल.

deepika padukone
दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. बॉलिवूडच्या सीमा पार करुन हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या फॅशनेबल लूकमुळे चर्चेत असते. ‘पद्मावती’ चित्रपटासाठी सज्ज झालेल्या दीपिकाने नुकतेच एका ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटमधून तिचा ‘रॉयल’ अंदाज सर्वांचं लक्ष वेधतोय. या फोटोशूटमधील तिचा लूक पाहून परिकथांमधील राजकुमारीची नक्की आठवण येईल.

‘तनिष्क’ची ब्रँड अॅम्बेसेडर असलेली दीपिका याआधी जाहिरातीमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत दिसली होती. ‘तनिष्क’च्या नवीन जाहिरातीसाठी तिने हा फोटोशूट केला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राणी पद्मावती यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे. याआधी ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दीपिकाने राजकुमारीची भूमिका साकारली होती. या फोटोशूटमधील तिचा लूक एखाद्या राणीप्रमाणेच आहे.

04-05-2017-tanishq_201_c_for-print

04-05-2017-tanishq_471_print

वाचा : दिशा पटानीची हॉलिवूडच्या पेनेलोप क्रूजशी तुलना

‘पद्मावती’ चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात दीपिका राणी पद्मावती तर, रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्लजीच्या भूमिकेत झळकणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान दीपिकाने आणखी एका चित्रपटासाठी होकार दिला आहे. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात दीपिका भूमिका साकारणार असून अभिनेता इरफान खानसुद्धा यामध्ये झळकणार आहे. त्यामुळे ‘पिकू’नंतर दुसऱ्यांदा दीपिका आणि इरफान एकत्र काम करणार आहेत.

04-05-2017-tanishq_653_print

04-05-2017-tanishq_820_print

VIDEO : चंदन कपिलसमोर विमानातील ‘त्या’ वादाची आठवण काढतो तेव्हा…

याआधी एका मासिकासाठी फोटोशूट केल्यानंतर दीपिकाने काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर नेटीझन्सकडून तिच्यावर खूप टीकासुद्धा झाली. मात्र टीकाकारांना न जुमानता दीपिकाने आपले काम सुरू ठेवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Before padmavati deepika padukone photoshoot in royal style

ताज्या बातम्या