बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर असलेला अभिनेता बॉबी देओल नुकताच ‘क्लास ऑफ 83’ या चित्रपटात झळकल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटात बॉबी मुख्य भूमिकेत झळकला असून त्याने विजय सिंह ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. त्यातच या चित्रपटाच्या सेटवरील बिहाइंड द सीनचा एक व्हिडओ व्हायरल होत आहे.
‘क्लास ऑफ 83’ च्या बिहाइंड द सीनमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाचं नेमकं काम कसं होतं हे दाखविण्यात आलं आहे. तसंच यात बॉबी देओलसह अभिनेता शाहरुख खान, चित्रपट दिग्दर्शकदेखील दिसून येत आहेत. या चित्रपटात बॉबी वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय सिंह ही भूमिका साकारत आहे.
दरम्यान, ‘क्लास ऑफ 83’ या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत झळकला असून त्याच्यासोबत अनूर सोनी, विश्वजीत प्रधान, जॉय सेनगुप्ता यांनी स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
