खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सध्या नुसरत जहाँ या त्यांच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आल्या आहेत.
नुसरत जहाँ यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. नुसरत जहाँ या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. त्या नेहमी स्वत:चे विविध फोटो पोस्ट करत असते. नुकतंच नुसरत जहाँ यांनी त्यांचे बिकीनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.




नुसरत जहाँ यांनी शेअर केलेल्या या फोटोत त्या एका समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळत आहेत. यावेळी त्या समुद्राच्या किनाऱ्यावर विश्रांतीचे क्षण घालवताना दिसत आहे. नुसरत जहाँ यांनी यावेळी पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यावर त्यांनी पांढऱ्या रंगाचा नेट असलेला टॉप परिधान केला आहे. त्यासोबत त्यांनी लाल रंगाची लिपस्टिक आणि न्यूड मेकअप केला आहे. यादरम्यान त्यांनी सनग्लासेस परिधान केले आहेत.
नुसरत जहाँ यांनी या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. मला परत समुद्रावर घेऊन जा, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. यावेळी त्यांनी समुद्राच्या लाटांचा इमोजीही पोस्ट केला आहे.
२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली
अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती.
नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असे निखिल जैन याने सांगितले होते. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचे देखील निखिल जैनने सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुसरत जहाँ यांनी २६ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव इशान जे दासगुप्ता ठेवल्याचे म्हटले जाते. इशानच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव देबाशिस दासगुप्ता असे लिहिण्यात आले होते. देबाशिस हे यश दासगुप्ताचे खरे नाव आहे.