scorecardresearch

धक्कादायक! पल्लवी डेच्या आत्महत्येनंतर २१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीचा राहत्या घरीच आढळला मृतदेह, पोलीस तपास सुरु

२१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्री बिदीशा डे मजुमदारच्या (Bidisha De Mujumdar) मृत्युची धक्कादायक घटना समोर आली आहे.

21 year old Kolkata model Bidisha De Majumdar found dead, Bidisha De
२१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्री बिदीशा डे मजुमदारच्या (Bidisha De Mujumdar) मृत्युची धक्कादायक घटना समोर आली आहे.

२१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्री बिदीशा डे मजुमदारच्या (Bidisha De Mujumdar) मृत्युची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम करत असणाऱ्या बिदीशाचा तिच्या राहत्या घरीच मृतदेह आढळला आहे. फक्त वयाच्या २१व्या वर्षी बिदीशाचा मृत्यु होणं ही धक्कादायक बाब आहे. तिच्या मृत्युची बातमी कळताच बंगाली चित्रपसृष्टीला देखील धक्का बसला आहे.

कोलकाता येथील नगरबाजार परिसरात बिदीशा आपल्या आई-वडिलांसह भाड्याने एका घरात राहत होती. २५ मे २०२२ रोजी बुधवारी बिदीशाच्या घरी तिचा मृतदेह आढळला. मात्र तिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अजूनही या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत.

आणखी वाचा – VIDEO : हातात हात घालून एंट्री केली अन्…; गर्लफ्रेंडला घेऊन पार्टीमध्ये पोहोचला हृतिक रोशन

पोलिस सध्या अधिक माहितीसाठी तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची तसेच कुटुंबातील मंडळींची चौकशी करत आहेत. बिदीशाने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच बिदीशाच्या मृत्युचं खरं कारण समोर येऊ शकेल असं पोलीसांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – VIDEO : “घटस्फोट म्हणजे खेळ नव्हे”, आमिर खान-किरण रावचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले लोक

बिदीशाच्या मृत्युपूर्वी बंगाली अभिनेत्री पल्लवी डेने आत्महत्या केली होती. आता पुन्हा एक नवं प्रकरण समोर आलं आहे. मॉडेलिंग क्षेत्रात बिदीशाने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अनिरबेद चटोपाध्याय यांच्या ‘भार : द क्लाउन’ या लघु चित्रपटामध्ये तिने काम केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bengali actress bidisha de majumdar was found dead in her apartment in kolkata kmd