‘भाभीजी घर पर हैं’ फेम सौम्या टंडनचा करीना कपूरच्या गाण्यावर डान्स

सौम्याला क्लासिकल डान्सची आवड असून ती नेहमीच सोशल मीडियावर क्लासिकल डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.

saumya tandon, kareena kapoor
(Photo Credit : Saumya Tandon Instagram) सौम्याने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ फेम सौम्या टंडन ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सौम्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोम्याला क्लासिकल डान्स प्रचंड आवडतो. त्याचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता देखील तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सौम्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सौम्या बॉलिवूडची बेबो करीना कपूरच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील ‘आओगे जब तुम ओ साजना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर ती क्लासिकल डान्स करताना दिसते. सौम्याने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सौम्या यात अप्रतिम दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘मुंबईतील या सुंदर वातावरणात माझं एक आवडतं गाणं’, अशा आशयाचे कॅप्शन सौम्याने दिले आहे. सौम्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांनी यावर कमेंट करत सौम्याची स्तुती केली आहे.

आणखी वाचा : ‘पहिले संघर्ष करूनही चित्रपट मिळत नव्हते आणि आता…’, पंकज त्रिपाठीने केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_)

आणखी वाचा : मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

सौम्याने ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अनीता भाभीची भूमिका साकारली होती. गेल्या ५ वर्षांपासून ती ही भूमिका साकारत होती. तर गेल्या वर्षी सौम्याने ही मालिका सोडली. सौम्याने ‘ऐसा देस है मेरा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. तर ‘जव बी मेट’ या चित्रपटात सौम्याने करीना कपूरने साकारलेल्या गीतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या नंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘डांस इंडिया डांस’सारख्या रिअॅलिटी शोचे सुत्रसंचालन केले आहे. मात्र, सौम्याला खरी लोकप्रियता ही ‘भाभीजी घरपर है’ या मालिकेतून मिळाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhabhi ji gharpar hai fame saumya tandon dance on kareena kapoor song goes viral dcp