‘तुझ्यासाठी तर नक्कीच बघेन’, शिल्पा शिंदेने नेहा पेंडसेला दिल्या शुभेच्छा

‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे

छोट्या पडद्यावरील ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. उत्तम अभिनयशैली आणि विनोदीबुद्धीच्या जोरावर यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. याच मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदेने अंगुरी भाभीची भूमिका साकारली होती. शिल्पाने ही मालिका सोडून बरीच वर्षे झाली आहेत. शिल्पानंतर आता अनिता भाभी हे पात्र साकारणारी सौम्या टंडनने देखील ही मालिका सोडली आहे.

सौम्या टंडनच्या जागी अनिताची भूमिका अभिनेत्री नेहा पेंडसे साकारणार आहे. नेहाने मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर शिल्पाने देखील तो प्रोमो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

हा प्रोमो शेअर करत शिल्पा म्हणाली, “मी कधी कधी भाभीजी घरपर है ही मालिका भर्बुती जी आणि सक्सेना जी यांच्यासाठी बघायचे. नेहा आता तुझ्यासाठी तर नक्कीच बघेन कारण तू खरच एक उत्तम अभिनेत्री आहेस. अशा फार कमी अभिनेत्री आहेत ज्या सुंदर आणि प्रतिभाशाली आहेत. त्यापैकी तू एक आहेस.”

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, नेहाने एका मुलाखतीत भाभी जी घर पर है या मालिकेच्या चाहत्यांना विनंती केली होती की, “माझ्यात आणि सौम्यामध्ये तुलना करू नका. आम्ही प्रचंड मेहनत करत आहोत. प्रेक्षकांनी मला खुल्या मनाने ती भूमिका साकारण्यासाठी संधी आणि वेळ द्यावी.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhabhiji ghar par hai shilpa shinde praised nehha pendse dcp 98 avb