scorecardresearch

भाग्यश्रीच्या लेकीला काम मिळवण्यासाठी करावा लागला संघर्ष, म्हणाली, “घराणेशाहीमुळे…”

मी लंडनला गेले मात्र तिथे माझे कामात मन रमत नव्हते

भाग्यश्रीच्या लेकीला काम मिळवण्यासाठी करावा लागला संघर्ष, म्हणाली, “घराणेशाहीमुळे…”
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सलमान खान व भाग्यश्रीचा ‘मैने प्यार किया’ आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. हा चित्रपट न पाहिलेला प्रेक्षकवर्ग क्वचितच असेल. सलमान-भाग्यश्रीची या चित्रपटामधील केमिस्ट्री तर प्रचंड गाजली. मात्र ही जोडी पुन्हा पडद्यावर दिसली नाही. यातील मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीपासून लांब होती. मात्र आता तिची मुलगीदेखील अभिनयनात सक्रीय आहे. भाग्यश्रीची मुलगी असण्याचा तिला तोटा झाला होता याबद्दल तिने खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

मिथ्या या वेबसीरिजमधून पदार्पण करणारी अभिनेत्री आणि स्टार कीड म्हणजे अवंतिका दसानी, ती असं म्हणाली की “घराणेशाहीमुळे मला अभिनयात यायचे नव्हते. मी मार्केटिंग विषयात पदवी संपादन केली आहे.” तिने नोकरीदेखील केली आहे मात्र नंतर ती अभिनयाकडे वळली आहे. अभिनयाच्याबाबतीत बोलताना ती म्हणाली, “मी अभिनय करण्याचा विचार केला नव्हता. खरं सांगायचं तर मी खूप मेहनत केली आहे. कॉलेजमध्ये असताना मी टॉप केलं आहे. त्यानंतर मी लंडनला गेले मात्र तिथे माझे कामात मन रमत नव्हते. माझ्या भावाने मला अभिनयाचा सल्ला दिला, आता मला अभिनयात रस आहे.”

अवंतिकाने पदार्पणातच हुमा कुरेशी, परमब्रत चॅटर्जी, रजित कपूर आणि समीर सोनी या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. अवंतिकाचा जन्म मुंबईचा आहे. लवकरच ती नेनू स्टुडंट सर या तमिळ चित्रपटात दिसणार आहे

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 12:14 IST

संबंधित बातम्या