बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचा पहिला चित्रपट ‘मैंने प्यार किया’ द्वारे तिने या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. भाग्यश्री आज अभिनयापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
भाग्यश्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती आणि तिचा पती हिमालय यांची जोडीदेखील खूप पसंत केली जाते. दोघेही एकमेकांवर प्रेम करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
त्यांच्या लग्नाला ३५ वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षात पहिल्यांदाच असे काही घडले की भाग्यश्रीलाही आश्चर्य वाटले. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर ५६ वर्षीय हिमालयने पहिल्यांदाच आपल्या पत्नीला प्रपोज केले.
भाग्यश्रीला तिचा पती हिमालय दसानीने अचानक ३५ वर्षांनंतर प्रपोज केल्यावर ती आश्चर्यचकित झाली. भाग्यश्रीची तक्रार होती की हिमालयने तिला कधीही प्रपोज केले नाही. हिमालय दसानीने भाग्यश्रीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले, ज्यामुळे ती आश्चर्यचकित झाली आणि तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले. याबरोबरच तिने तिच्या पतीच्या रोमँटिक प्रपोजबद्दलही सांगितले.
अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले, ‘गुपित उलगडले आहे. हिमालयजी एक रोमँटिक पती असल्याबद्दल सर्व जण काहीही विचार करत असले तरी.. ते पूर्वी असे नव्हते आणि मी त्यांना सांगत राहिले की त्यांनी मला कधीही प्रपोज केले नाही. तर मी फोटोशूटच्या मध्यभागी होते, तेव्हा त्यांनी गाणे म्हणत मला थांबवले तेव्हा मला धक्काच बसला. पण हो, पतीने अखेर गुडघ्यावर बसून मला प्रपोज केले. मी काही फोटो शेअर करत आहे.”
भाग्यश्री आणि हिमालयची प्रेमकहाणी
भाग्यश्री आणि हिमालयच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकाच शाळेत शिकले. भाग्यश्रीच्या कुटुंबाने हे नाते स्वीकारण्यास नकार दिला. कुटुंबाच्या दबावाखाली भाग्यश्रीने हिमालयशी संबंध तोडले. त्यानंतर हिमालय अभ्यासासाठी अमेरिकेला गेला आणि भाग्यश्रीने तिचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ साइन केला. त्यानंतर हिमालय परत आल्यावर, भाग्यश्रीने तिच्या पालकांना शेवटचे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण ते मान्य झाले नाहीत; मग थकून भाग्यश्रीने पळून जाऊन हिमालयशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.