अहमदनगर महाकरंडकचा भरत जाधव ब्रँड अँबेसिडर

तरुणाईच्या सर्जनशील नाट्यकृतींची सकस स्पर्धा अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेत रंगणार आहे.

श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट प्रायोजित या स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून, या स्पर्धेचा अभिनेता भरत जाधव हा 'ब्रँड अँबेसिडर' आहे.

तरुणाईच्या सर्जनशील नाट्यकृतींची सकस स्पर्धा अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेत रंगणार आहे. राज्यभरातील आठ केंद्रांवर स्पर्धेची  प्राथमिक फेरी रंगणार आहे. श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट प्रायोजित या स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून, या स्पर्धेचा अभिनेता भरत जाधव हा ‘ब्रँड अँबेसिडर’ आहे.
अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, कोकण आणि औरंगाबाद या केंद्रांवर प्राथमिक फेरी २ ते १० जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यातील दर्जेदार २५ संघांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात येणार आहे. माझे मन तुझे झाले फेम हरीश दुधाडे आणि लेखक दिग्दर्शक अभिजित दळवी प्राथमिक फेरीचे परीक्षण करणार आहेत. अंतिम फेरी नगर येथील माऊली सभागृहात २१ ते २४ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची पारितोषिके असून, सर्वोत्कृष्ट एकांकिकेला ६१ हजार १११ रुपये आणि महाकरंडक प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज ५ डिसेंबरपासून उपलब्ध होणार असून, नोंदणीसाठी २५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. प्रवेश अर्ज http://www.mahakarandak.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bharat jadhav brand ambassador of ahmadnagar mahakandak one act play competition