Video: नोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे भारती सिंह संतापली; भरस्टेजवरुन तिला खेचत घेऊन गेली

भारतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

bharti sing, nora fatehi, dance deewane 3,
भारती, हर्ष आणि नोराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन म्हणजे भारती सिंह. भारती सिंह सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती ‘डान्स दीवाने ३’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. सेटवरचा भारतीचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात अभिनेत्री, डान्सर नोरा फतेहीने हजेरी लावली होती. दरम्यान नोरा भारतीचा पती हर्षसोबत ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ या गाण्यावर डान्स करताना दिसते. नोराचे हर्षसोबत डान्स करणे भारतीला आवडत नाही. ती संतापते आणि नोराला खेचत भरस्टेजवरून खाली घेऊन जाते. दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या परीक्षकांना देखील हसू अनावर होते. भारती, हर्ष आणि नोराचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘देवमाणूस’ मालिकेच्या टीमला देखील ‘ओ शेठ’ गाण्याची भूरळ, व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by (@bollykaahanii)

भारती लवकरच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. सुरवातीला ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये भारती बुआची भूमिका साकारत होती. सध्या ती ‘डान्स दीवाने 3’ हा शो होस्ट करत आहे. हा शो होस्ट करण्यासाठीची तिची फी ७० टक्के कमी करण्यात आली. तर आता लवकरच सुरू होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’साठी तिची ५० टक्के फीस कमी केल्याचा खुलासा भारतीने एका मुलाखतीमध्ये केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bharti sing dragged nora fatehi on dance deewane 3 set video viral avb