भारती- हर्षची पत्रिका पाहून तुम्ही हसालच

खास दिल्लीवरुन ही लग्न पत्रिका तयार करण्यात आली आहे

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचे लग्न जस जसे जवळ येतेय त्यांच्या लग्नाच्या नवनवीन बातम्या वाचकांना वाचायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो पाहायला मिळत होते. पण आज मात्र तिची लग्न पत्रिकाच समोर आली आहे. ही लग्न पत्रिका फार वेगळी आहे. खास दिल्लीवरुन ही लग्न पत्रिका तयार करण्यात आली आहे. पुनीत गुप्ता इनव्हिटेशन यांनी ही पत्रिका खास डिझाइन केली आहे. या पत्रिकेवरुन हे एक बीच थीम वेडिंग असणार हेही दिसून येते. पत्रिकेच्या कव्हरवर शंख शिंपल्यांचे डिझाईन आहे. या डिझाइनच्यामध्ये भारती आणि हर्ष याचे नाव लिहिलेले आहे. बीच थीम असल्यामुळे पत्रिकेच्या बॅकग्राऊंडला अॅक्वा-ब्लाईंड कलर आणि समुद्राचा फील देण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/BbOXbBcFEEI/

पत्रिकेच्या आत दोघांचा फोटो दिसतो. या फोटोमध्ये भारतीने हर्षला तिच्या खांद्यावर उचलून घेतले आहे आणि या फोटोवर दुल्हा हम ले जाऐंगे असे मोठ्या अक्षरात लिहिले गेले आहे. ही पत्रिका एका पांढऱ्या लाकडाच्या छोट्या पेटीत लॉक करुन पेटी निळ्या रंगाच्या रिबीनने सजवली आहे.

 

३ डिसेंबरला गोव्यात हे प्रेमी जोडपं लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. तीन दिवसांच्या या लग्नामध्ये भारती आणि हर्ष मुंबईमध्येही लग्नाच्या काही विधी ठेवणार आहेत. दोघांच्याही घरी माता की चौकी होणार आहे. याशिवाय गोव्याला जाण्याआधी भारतीच्या घरी पंजाबी पद्धतीने बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. हनीमूनसाठी ते युरोप ट्रीपला जाणार आहेत. भारती आणि हर्ष गेल्या अनेक वर्षांपासून नातेसंबंधात आहेत. याचवर्षी त्यांनी रोका केला होता. हे जोडपे प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा ‘नच बलिये’मध्ये एकत्र आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bharti singh haarsh limbachiyaa wedding card is here and it is as cool as the couple

ताज्या बातम्या