भारती सिंहने जामीन मिळाल्यानंतर केली पोस्ट; म्हणाली…

जाणून घ्या तिची काय होती पोस्ट

कॉमेडी क्विन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांना काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर दोघांचीही जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर भारतीने पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने हर्ष सोबतचा फोटो शेअर केला असून दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती हर्ष सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कधीकधी काळ आपली परिक्षा घेत असतो, ती आपली कमतरता दाखवण्यासाठी नाही तर आपल्यामधील सामर्थ्य शोधण्यासाठी या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

आणखी वाचा : भारती सिंहवरुन ट्रोल केल्यामुळे भडकला कपिल, म्हणाला ‘पहिले तुझ्या…’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावे समोर आली होती. या यादीत भारती सिंह हिचे देखील नाव समोर आले होते. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. भारती आणि हर्षने जामीनासाठी अर्ज केला होता आणि तो मंजूर देखील झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bharti singh shares pics with hubby haarsh limbachiyaa dcp98 avb

ताज्या बातम्या