भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेच्या ‘पांडू’ चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित

हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जाणून घ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख…

bhau kadam, kushal badrike, pandu movie, pandu movie teaser,

गेल्या काही दिवसांपासून अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके मुख्य भूमिकेत असणारा ‘पांडू’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषण झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आहे.

‘पांडू’ या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये. आजच्या घडीला विनोदातील हुकुमी एक्के म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीचं. त्यामुळे ‘पांडू’ या चित्रपटात या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील या कलाकाराला बिग बॉस १५ची ऑफर

या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलतांना भाऊ म्हणाले की, “सध्याच्या या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाहीये. ‘पांडू’ प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे.”

‘पांडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडुओने केली आहे. हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhau kadam and kushal badrike pandu movie teaser avb