प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. ती २५ वर्षांची होती. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. आकांक्षा दुबे भोजपूरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

टिकटॉक व इन्स्टाग्राम रील्समधून प्रसिद्धी मिळवलेल्या आकांक्षाने १७व्या वर्षी भोजपुरी सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. तिच्या आत्महत्येच्या बातमीने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आकांक्षा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळायचं. आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये भोजपुरी गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. आता निधनानंतर आकांक्षाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…

हेही वाचा>> Video: पुरस्कार सोहळ्यातील डोळ्यांत पाणी आणणारा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ जाधवची पोस्ट, म्हणाला “अशोक मामा…”

मध्य प्रदेशातील मिर्जापूर येथे २१ ऑक्टोबर १९९७ साली आकांक्षाचा जन्म झाला होता. तीन वर्षांची असताना ती स्वप्ननगरी मुंबईत आली होती. लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड असणाऱ्या आकांक्षाला आयपीएस ऑफिसर बनवण्याचं स्वप्न तिच्या वडिलांनी पाहिलं होतं. परंतु, आकांक्षाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं.

हेही वाचा>> “नाटू नाटूला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला” अजय देवगणचं ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये वक्तव्य, म्हणाला…

भोजपूरी मनोरंजनसृष्टीत काम करणं सोपं नसल्याचं आकांक्षाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. काम मिळत नसल्याने आकांक्षा २०१८ मध्ये नैराश्यात गेली होती. तिने भोजपुरी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आईच्या सांगण्यावरुन ती पुन्हा काम करण्यास तयार झाली होती. आकांक्षाने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की २’ या चित्रपटांमुळे आकांक्षाला लोकप्रियता मिळाली. आजच(२६ मार्च) भोजपूरी अभिनेता पवन सिंहबरोबर तिचं ‘आरा कभी हारा नही’ गाणं प्रदर्शित झालं आहे.