scorecardresearch

रोड शोमध्ये तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी; प्रसिद्ध अभिनेत्रीने स्कुटीवरून अनवाणी काढला पळ, Video Viral

रोड शोमध्ये गर्दी झाल्याने स्कुटीवरून गेली अभिनेत्री, सेल्फीसाठी लोक पाठीमागे धावले, व्हिडीओ एकदा पाहाच!

रोड शोमध्ये तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी; प्रसिद्ध अभिनेत्रीने स्कुटीवरून अनवाणी काढला पळ, Video Viral
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चप्पल न घालता घाईघाईत स्कूटीवरून जाताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने तिचा चेहरा स्कार्फने झाकला आहे. हा व्हिडीओ बिहारमधील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा आहे.

अक्षरा सिंह बेतिया येथे होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रोड शोमध्ये सहभागी झाल्या होती. रोड शो संपताच अक्षराबरोबर सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी जमली. हळूहळू इतके लोक जमले की तिला गाडीतून खाली उतरून घाईघाईनं स्कूटीवरून जावं लागलं. या निवडणुकीतील उमेदवार महिलेच्या पतीने अक्षराला या गर्दीतून बाहेर काढलं. त्याने स्कूटी चालवली आणि अर्चना चेहरा झाकून स्कूटीवर बसली. तर, लोक त्यांच्या मागे धावत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षराने निळ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे. अभिनेत्री अनवाणी पायाने स्कूटीवर मागे बसली आहे आणि लोक त्यांच्या मागे धावत आहेत.

दरम्यान, अक्षरा सिंह कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी, स्टेजवर परफॉर्म करताना एका माणसाने तिच्यावर नोटा उडवल्या होत्या. त्याच्या कृत्याचा तिला राग आला होता, त्यामुळे ती मध्येच शो सोडून निघून गेली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 16:21 IST

संबंधित बातम्या