Priyanka Pandit MMS Controversy & Pregnancy: भोजपुरी सिनेसृष्टीतील एकेकाळची बोल्ड आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका पंडित सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. एका एमएमएस लीक विवादामुळे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर प्रियंकाने अभिनय सोडून वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्या म्हणून अध्यात्माचा मार्ग निवडला होता. त्यानंतर तिने महाराजांच्या एका सेवकाशी गुपचूप विवाह केला. आता प्रियंकाने गरोदर महिलांची काळजी घेण्याबाबत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावुक पोस्ट शेअर केली असून, ती लवकरच आई होणार होणार आहे.
प्रियंका पंडित होणार आई
इंडस्ट्री सोडल्यानंतर प्रियंका पंडितने प्रेमानंद महाराजांच्या एका सेवकाशी गुपचूप लग्न केलं होतं. मात्र, तिने अद्याप तिच्या पतीची ओळख चाहत्यांशी करून दिलेली नाही. आता प्रियंका लवकरच आई होणार आहे. तिने तिच्या प्रेग्नन्सीबाबत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.
३५ वर्षांच्या प्रियंकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “गरोदर महिलांशी प्रेमाने वागा. त्यांच्या गर्भात केवळ एक बाळ वाढत नसतं तर त्या प्रत्येक गोष्ट दुप्पट प्रमाणात अनुभवत असतात. ताणतणाव, आवाज, दडपण, आजूबाजूची ऊर्जा – जे काही ती अनुभवते, ते तिच्या बाळापर्यंतही पोहोचतं. तिचं शरीरच बाळाचं जग बनतं. म्हणूनच त्यांच्याशी प्रेमाने बोला, चांगलं वागा आणि त्यांच्या मानसिक शांततेची काळजी घ्या.”

प्रियंका पंडितचा व्हायरल एमएमएस
काही काळापूर्वी प्रियंका पंडितचा एक एमएमएस व्हायरल झाला होता. हा एमएमएस तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा होता. यामुळे खूप गदारोळ झाला होता, त्यानंतर प्रियंकाने तो व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं होतं. तो व्हिडीओ तिचा नसून त्यात दिसणारी मुलगी दुसरी कोणीतरी आहे, असं स्पष्टीकरण तिने दिलं होतं. काही लोक तिची प्रतिमा मलीन करण्याचा आणि करिअर बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळेच ते हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत, असं ती म्हणाली होती. पण या वादाचा प्रियंकाच्या करिअरवर परिणाम झाला.
प्रियंकाला काम मिळणं बंद झालं
एमएमएस विवादानंतर प्रियंका पंडितने दावा केला होता की तिला अचानक काम मिळणं बंद झालं. त्यानंतर ती भोजपुरी चित्रपटसृष्टीपासून दुरावली आणि कृष्णभक्तीत लीन झाली. तिने ग्लॅमरस दुनिया सोडून वृंदावनामध्ये जायचा निर्णय घेतला. आता प्रियंका स्वतःला प्रेमानंद महाराजांची शिष्या म्हणते. तिने गुपचूप एका हरी सेवकाशी लग्न करून तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.
प्रियंका पंडितने ‘पवन पुत्र’, ‘इच्छाधारी’, ‘आवारा बालम’, ‘कर्म युग’ आणि ‘तोड दुश्मन की नली राम और अली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. आता ती चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर अतिशय साधे आयुष्य जगत आहे.
